By-election Results 2026 live साम टीव्ही मराठी
देश विदेश

Bypoll : पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! भाजपची २ राज्यात बाजी, काँग्रेस पराभवाच्या छायेत; विजय यांच्या TVK ने खाते उघडले

By-election Results 2026 live : चार राज्यांतील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीत आसामच्या नागाव आणि पश्चिम बंगालच्या नंदीग्राम व रेजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सुरुवातीचे कल दर्शवतात.

Namdeo Kumbhar

Bypoll Results Update: पश्चिम बंगालसह ४ राज्यातील पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या टप्प्यातच भाजपने २ राज्यात मुसंडी मारली आहे. तर तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या TVK ने खाते उघडले आहे. केंद्रशासित पुदुच्चेरीमध्ये AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

४ राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मतमोजणीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपने दोन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात अभिनेते विजय यांच्या 'तमिळगा व्हेट्री कळगम' (TVK) पक्षाने जोरदार मुसंडी मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच, AINRC पक्षानेही विजयाचे खाते उघडलेय.

आसाममधील नागाव मतदारसंघात भाजप विजयाच्या जवळ

आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार देवाशिष शर्मा यांनी मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देवाशिष शर्मा यांनी प्रतिस्पर्धी AIUDF चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्यावर ७५,२४८ मतांची आघाडी मिळवली आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मतांची सद्यस्थिती:

देवाशिष शर्मा (भाजप): १,८१,०१७ मते (आघाडीवर)

बद्रुद्दीन अजमल (AIUDF): १,०५,७६९ मते

शिबामणी बोरा (काँग्रेस): २९,८२६ मते (तिसऱ्या क्रमांकावर)

नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये भाजप आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता कडक सुरक्षेत सुरू झाली. सुरुवातीच्या मतमोजणीच्या कौलानुसार दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीरानी रथ मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान हे दुसऱ्या स्थानावर आहेत. रेजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार सखरव सरकार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. काँग्रेसचे मोहम्मद अब्दुल्लाहील काफी पराभवाच्या छायेत आहेत.

काँग्रेसचा पराभव

पुदुच्चेरी येथील थट्टांचावडी (Thattanchavady) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस (AINRC) पक्षाचे उमेदवार अशोक आनंद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अशोक आनंद यांनी काँग्रेसचे उमेदवार ई. विनायगम (E Vinayagam) यांचा ८,४०० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

विजय यांच्या टीव्हीकेची मुसंडी

तमिळनाडूतील धारापुरम (Dharapuram) विधानसभा मतदारसंघाच्या १० व्या फेरीच्या मतमोजणीनंतर अभिनेते विजय यांच्या 'तमिळगा व्हेट्री कळगम' (TVK) पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. २७,६४९ मते मिळवत ४,१२८ मतांनी आघाडी घेतली आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकत TVK ने मिळवलेली ही आघाडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर सुरक्षा वाढवली

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?

Banana vs dates: केळी की खजूर...काय खाणं आरोग्यासाठी बेस्ट, शरीरात काय बदल होतात?

दुष्काळात भक्तांच्या मदतीला धावला 'विठू माऊली'! मंदिर समितीचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार 'एवढा' निधी

Mumbai News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! विद्याविहार उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

SCROLL FOR NEXT