Pope Francis passes away at 88 saam tv
देश विदेश

Breaking News : पोप फ्रान्सिस यांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pope Francis passes away : ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं ८८ व्या वर्षी निधन झाले. पोप यांच्या निधनाच्या या बातमीने जागतिक ख्रिश्चन समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Namdeo Kumbhar

Pope Francis passes away at 88 : मानवतावादी कार्य आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. व्हॅटिकन यांनी व्हिडिओ पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते.

पोप यांच्या निधनाच्या या बातमीने जागतिक ख्रिश्चन समुदायावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कारकिर्दीत चर्चमध्ये सुधारणा, मानवतावादी कार्य आणि शांततेचा संदेश दिला. त्यांच्या निधनानं जगभरातील ख्रिश्चन भाविक शोकसागरात बुडाले आहेत. व्हॅटिकनने पुढील प्रक्रियेसाठी कॉन्क्लेव्ह बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकन यांनी पुढील प्रक्रियेबाबत माहिती दिली. कार्डिनल फेरेल यांनी सांगितले की, लवकरच नवीन पोप निवडीसाठी कॉन्क्लेव्ह बोलावले जाईल. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने जागतिक ख्रिस्ती समुदायावर शोककळा पसरली आहे. जगभरातील नेते आणि भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पोप फ्रान्सिस हे गेल्या काही महिन्यांपासून आजारांशी लढत होते. फेब्रुवारीमध्ये ब्रॉन्कायटिसमुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रॉन्कायटिसचे डबल न्यूमोनियामध्ये रूपांतर झाले. पोप यांच्यावर पाच आठवडे रुग्णालयात उपचार सुरू होते. न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास त्यांना होता. रोममधील जेमेली रुग्णालयात ३८ दिवसांच्या उपचारांनंतर २३ मार्च २०२५ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT