Poonch Terrorist Attack Saam Tv
देश विदेश

Poonch Terrorist Attack: मार्चमध्ये होणार होते लग्न; तर कुणी पत्नीला दिलं होतं वचन, दहशतवाद्यांच्या हल्लानंतर सगळं संपलं

Terrorist Attack :जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी २१ डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी लष्काराच्या वाहनांवर अचानक गोळीबार केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Poonch Terrorist Attack :

जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी २१ डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी लष्काराच्या वाहनांवर अचानक गोळीबार केला. शहीद जवानांमध्ये उत्तराखंडच्या पौड़ी गढ़वालचे रायफनमॅन गौतम कुमार, उत्तर प्रदेशातील कानपूरचे करण कुमार, चमोलीचे बिरेंद्र सिंग आणि बिहारचे नवाडा येथील चंदन कुमार यांचे निधन झाले आहे.

मार्च मध्ये होणार होते लग्न

शहीद जवानांपैकी गौतम कुमार यांचे नवीन वर्षात मार्च महिन्यात लग्न होणार होते. परंतु लग्न होण्याआधीच त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत गौतम कुमार यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, गौतम यांचे लग्न ११ मार्च २०२४ रोजी होणार होते. घरातील सर्वजण लग्नाच्या तयारीत होते. त्यांचा साखरपुडा ३० सप्टेंबर रोजी पार पडला. मात्र, लग्न होण्याआधीच त्यांचे निधन झाल्यानं सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. गौतम हे २०१४ साली सैन्य दलात सामील झाले होते. मागील २ वर्षांपासून ते पूंछमध्ये ड्यूटीवर होते. सप्टेंबर महिन्यात ते शेवटचे घरी आले होते.

बिरेंद्र सिंग यांच्या निधनाने कुटुंबियांवर शोककळा

चमोलियाच्या बमियाला गावातील बिरेंद्र सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. बिरेंद्र सिंग हे फक्त ३२ वर्षाचे होते. त्यांचे पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. बिरेंद्र सिंग यांचे वडील सुरेंद्र सिंग शेतकरी तर आई गृहिणी आहे. तर बिरेंद्र यांचा एक भाऊ इंडो-तिबेट बॉडर पोलीस दलात कार्यरत आहे. बिरेंद्र सिंग यांचा मृतदेह आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे.

कानपूरचे करण कुमार शहीद

पुंछ येथे झालेल्या हल्ल्यात कानपूरच्या बाहूपूर गावचे करण कुमार शहीद झाले. करण कुमार यांचे निधन झाल्यावर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. ते २०१३ साली सैन्यात दाखल झाले होते. पत्नी आणि २ वर्षांच्या मुली असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावी पोहचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण सप्टेंबर महिन्यात शेवटचे घरी आले होते. फेब्रुवारीमध्ये घरी येऊन होळी साजरी करणार असल्याचे त्यांनी फोन करुन घरी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT