SOUTH INDIA POLITICS HEATS UP! CONGRESS FACES INTERNAL RIFT AFTER BIG RESIGNATION Saam tv
देश विदेश

Congress: दक्षिणेतील राजकारण तापलं! AIADMK नंतर काँग्रेसमध्येही धूसफूस, बड्या महिला नेत्याचा राजीनामा

Tamil nadu Politics: तामिळनाडूच्या राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षासोबत एआयएडीएमकेचे आमदार गेल्यानं काँग्रेसमध्ये धूसफूस सुरू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून राजीनामे पडू लागले आहेत.

Bharat Jadhav

  • दक्षिण भारतातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग.

  • काँग्रेसच्या युवा शाखेचे सचिव व्ही. श्रीनिधी यांचा राजीनामा.

  • AIADMK चे चार आमदार TVK पक्षात दाखल.

दक्षिणेतील राजकारणाच्या घडामोडी एखाद्या चित्रपटातील कथानकासारखं घडत आहेत. एकीकडे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे तमिळनाडूत विरोधी पक्षातील आमदार आणि नेते मंडळी धडाधड राजीनामे देत सुटले आहेत. विधानसभेत सत्ताधारी डीएमकेसह इतर पक्षांचा धुव्वा उडवल्यानंतर आता मुख्यमंत्री विजयाचा करिष्मा पाहता विरोधी पक्षात राजीनामा सत्र सुरू झालंय.

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय युवा शाखेचे सचिव व्ही. श्रीनिधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडील घडामोडींनुसार ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) पक्षाचे ४ आमदार तमिळगा वेट्री कळघम (TVK) मध्ये सामील झालेत. AIADMK च्या आमदाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोडल्यानंतर आपला हा बदल घडला आहे. परंतु AIADMKचे आमदार टीव्हीकेमध्ये गेल्यामुळे काँग्रेसमध्ये धूसफूस सुरू झाली आहे, त्याचा परिणाम पक्षात राजीनामा सत्र सुरू झालंय.

श्रीनिधी यांनी काँग्रेस पक्षाकडून तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली होती. सिंगनल्लूर मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आता मात्र त्यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या राष्ट्रीय युवा शाखेचे सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी पक्षाच्या दिशेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एआयएडीएमकेच्या आमदारांचा टीव्हीकेमध्ये समावेश होणं हे विभाजनवादी शक्तींशी युती करणं आहे. जेथे काँग्रेस पक्ष विभाजनाला विरोधात करत होता आता विभाजनवादी नेत्यासोबत जात आहे.

आपल्या राजीनामा पत्रात, श्रीनिधी यांनी पक्षाच्या निर्णयावर पक्षश्रेष्ठीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. यामुळे आपल्या पदावर राहण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम झाल्याचे म्हटले आहे. 'ज्यांना धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीतून (SPA) आधीच राजकीय फायदा झाला आहे, ते तळागाळात काम करणाऱ्यांच्या भावनांचा विचार न करता असे निर्णय घेत असल्याचे दिसत असल्याचं त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.

दरम्यान श्रीनिधी यांचा हा राजीनामा काँग्रेस पक्षातील एकजूट आणि राजकीय तत्त्वांचे पालन याबाबत वाढत्या असंतोषाचे प्रतिक आहे. श्रीनिधी यांनी अधोरेखित केले की, हा केवळ एक राजीनामा नसून पक्षनेते आणि तळागाळातील कार्यकर्ते यांच्यातील विश्वासाला तडा गेल्याच्या जाणिवेतून दिलेली ही एक प्रतिक्रिया आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आपल्या आघाड्या आणि अंतर्गत ऐकता कायम ठेवणं कठीण झालंय. टीव्हीकेमध्ये एआयएडीएमकेच्या माजी सदस्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या आघाड्यांच्या स्थिरतेवर आणि तळागाळातील पाठिंब्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये या ठिकाणी दिसतील दुर्मिळ पाणमांजरं, प्रदूषणाच्या विळख्यातही टिकवले अस्तित्व; पाहा फोटो

Maharashtra News Live Update: उदगीर येथील दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग

भाजपच्या २ दिग्गज नेत्यांवर गुन्हा, गुंगीचे औषध देत महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार; अश्लिल व्हिडीओ काढले अन्...

LIC Scheme: महिलांसाठी LICची जबरदस्त योजना! दहावी पास असणाऱ्यांना महिन्याला मिळणार ₹७०००, लाभ कसा घेता येईल?

गोळ्या-औषधं सोडा! 'हे' हेल्दी ड्रिंक्स युरिक ॲसिड झटक्यात करेल कमी

SCROLL FOR NEXT