Congress  Saam TV
देश विदेश

Political News: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाच्या खासदारांचा मोठा निर्णय

Uddhav Thackeray-Congress : उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावातील भाषणातून राहुल गांधीं चांगलच ठणकावलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Political News : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असं चित्र निर्माण झालं आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावातील भाषणातून  राहुल गांधींना चांगलच ठणकावलं होतं.

सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा  उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी आज म्हणजे २७ मार्चला संध्याकाळी सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांच्या घरी डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. मात्र या डिनर पार्टीला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती ठाकरे खासदार संजय राऊत यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा एकही खासदार या डिनर पार्टीला उपस्थित राहणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचं दैवत आहेत. आमच्या दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं येड्यागबाळ्याचं काम नाही. ज्या सावरकरांनी 14 वर्षे अनन्वित छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. मात्र आपल्याला तोडण्याचं काम केलं जातंय. त्यासाठी आपल्याला डिवचलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT