West Bengal Bus Driver Raid: 15 Kg Gold, 35 Sacks Of Cash Allegedly Found saam tv
देश विदेश

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Police Raid On Bus Driver House: पोलिसांनी एका बस चालकाच्या घरावर छापा टाकला. चालकाच्या घरातील पैशाचं घबाड पाहून पोलिसांनाही घाम फुटला. नोटा मोजणाऱ्या मशीन्स बंद पडल्या.

Bharat Jadhav

  • पश्चिम बंगालमधील सरकारी बस चालकाच्या घरावर छापेमारी झाल्याची माहिती.

  • घरातून सुमारे २० कोटी रुपयांची रोकड सापडल्याचा दावा.

  • छाप्यात १५ किलो सोन्याची बिस्किटे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील एका सरकारी बस चालकाच्या घरात पैशांचं घबाड सापडलंय. बस चालक म्हटला तर त्याचा पगार आणि त्याची एकूण संपत्ती बाबत आपण एक अंदाज लावून शकतो. एका सरकारी बसवर चालक म्हणून काम करणाऱ्यांच्या घरात २० कोटी रुपयांचा काळा पैसा आणि १५ किलो सोन्याचे बिस्किट्स सापडली आहेत.

एका बस चालकाकडे इतका पैसा पाहून अनेकांची डोके चक्रावली. पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा गुप्त माहितीच्या आधारे ज्यावेळी या बस ड्रायव्हरच्या घरावर छापा मारला, त्यावेळी तेथील दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले. घरात मिळालेल्या रोकड रक्कम मोजता मोजता चक्क ५ मशीन्स बंद पडल्या.

मीनार मंडल असं कोट्यवधी ड्रायव्हरचं नाव आहे. पश्चिम बंगालमधील देउचा येथील रहिवाशी आहेत. पोलिसांना यांच्याकडील संपत्तीबाबत गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची सहानिशा करून मंडल यांच्या घरावर धाड मारली. त्यावेळी मीनार मंडल यांच्या घरात कुबेरचा खजिना असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. हाती आलेल्या माहितीनुसार कधीकाळी बस चालक म्हणून काम करणारा मीनार मंडल हा तुलू मंडल या दगड-व्यापाऱ्याचा मेहुणा आहे.

मीनार मंडलच्या घरातील पैसा आणि सोन्याची बिस्किट्स पाहून अधिकारीही चक्रावले. मीनार मंडल यांच्याकडे एक दोन नाही तर ३५ पोत्यामध्ये कोट्यवधी पैसा आणि १५ किलो सोन्याची बिकिस्ट्स सापडली. पोत्यांमधील पैसा मोजतांना अधिकाऱ्यांना घाम फुटला. संपूर्ण पैसा मोजण्यासाठी पाच मशीन्स लावण्यात आल्या.

नोट्स मोजताना पाच मशीन्स पडल्या बंद

हा काळा पैसा मोजण्यासाठी पाच मशीन्स मागवण्यात आल्या. घरात तासनतास नोटा मोजणाऱ्या मशीन्सचा आवाज चालू होता. तरीही नोटांचा साठा संपण्याचे काही नावच घेत नव्हते. दरम्यान हा खजिना जमा करण्यासाठी आणि प्रत्येक पैसा सुरक्षितपणे सीलबंद करून ठेवण्यासाठी पोलिसांना पाच मोठी व जड लोखंडी पेटी (ट्रंक) आणावी लागली होती.

कोट्यवधींचे रॅकेट!

एका बस चालकाकडे इतके सोने आणि रोख रक्कम कुठून आली? असा अधिकाऱ्यांना पडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार बेकायदेशीर दगड उद्योगातून हा पैसा जमा केला असावा. तीन जिल्ह्यांमधील दगड उद्योगांसाठी प्रवेशद्वारांवर कर गोळा करण्याचा आरोप 'तुलू मंडळ'च्या एजन्सीवर आहे. सरकारकडे जमा होणाऱ्या पैशावर डल्ला त्यांनी मारला होता. दर महिन्याला ८३ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाली पाहिजे होते. पण प्रत्यक्षात केवळ २ ते ५ कोटी रुपयांचीच नोंद केली जात होती. आणि इतर उरलेली रक्कम मीनार मंडलच्या घरात जमा केली जात होती.

"कोणत्याही माफिया व्यक्तीला सोडले जाणार नाही."

या धाडीनंतर राज्याच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट करताना, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भ्रष्टाचार करणाऱ्यांना एक गंभीर इशारा दिलाय. भ्रष्टाचाराविरुद्धचे आमचे ' zero-tolerance policy यापुढेही कायम राहील.

मागील सरकारच्या काळात मिळालेल्या संरक्षणाचा गैरफायदा घेऊन जनतेच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची आहे आणि तिची लूट करणाऱ्यांना कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. माफियाविरुद्धची ही कारवाई अशीच सुरू राहील, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Om chanting benefits: दररोज 21 दिवस ‘ॐ’चा जप केल्याने काय बदल घडतात?

भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT