महिलांना अश्लील व्हिडिओ, मेसेज करणारा जीम ट्रेनर पोलिसांच्या जाळ्यात  Saam Tv
देश विदेश

महिलांना अश्लील व्हिडिओ, मेसेज करणारा जीम ट्रेनर पोलिसांच्या जाळ्यात

या बनावट अकाऊंटच्या माध्यमातून तो महिला आणि मुलींशी मैत्री करून त्यांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सोशल मीडिया अकाउंटवर तयार केलेल्या बनावट खात्यांमधून ऑनलाइन माध्यमातून शंभरहून अधिक महिलांना त्रास देणाऱ्या एका जीम ट्रेनरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विकास कुमार असे या आरोपीचे नाव आहे. विकास कुमारने सोशल मीडियावर मुलींच्या नावे बनावट अकाउंट तयार केले होते. या बनावट अकाऊंटच्या माध्यमातून तो महिला आणि मुलींशी मैत्री करून त्यांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवायचा. अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक अमित गोयल यांनी माहिती दिली. सागरपूर पोलिस ठाणे परिसरातील एका महिलेने आपल्या फेसबुक मेसेंजरवर शीतल ठाकूर नावाच्या प्रोफाइलवरून अश्लील व्हिडिओ आणि मेसेज येत असल्याची तक्रार केली होती. फेसबुकवर शीतल ठाकूर नावाच्या व्यक्तीने जेव्हा तक्रारदार महिलेला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले तेव्हा त्या महिलेने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर बनावट अकाऊंट तयार केलेल्या विकास कुमारने आपण तिला वैयक्तिकरित्या ओळखत असल्याचे सांगितले.

तक्रारदार महिलेच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील सायबर सेलचे निरीक्षक रमण कुमार सिंह आणि सागरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि शीतल ठाकूर यांच्या नावाने तयार केलेल्या प्रोफाइलविषयी फेसबुकवर माहिती गोळा करण्यास सुरवात केली. तपासात पोलिस पथकाला रियाझुद्दीनच्या नावाने जारी केलेला मोबाइल नंबर सापडला. त्याच नंबरवरुन आणखी दोन प्रोफाइल चालू होती. हा नंबर बनावट ओळखपत्राच्या मदतीने खरेदी केल्याचे तपासात समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने विकासला अटक केली. विकास मूळचा मेरठ, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पण तो लहानपणापासूनच त्याच्या आई वडिलांसोबत दिल्लीत राहत होता. तो द्वारका येथील जिम ट्रेनर आहे आणि त्याला अश्लील व्हीडिओज पाहण्याची सवय आहे. या व्यसनामुळे त्याने बनावट प्रोफाइल बनवून मुलींशी मैत्री केली, असेही त्याने सांगितले. आरोपी विकास मुलीशी जवळीकता वाढवण्यासाठी त्यांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवत असे. इतकेच नव्हे तर त्याने पूजा कुमारी आणि शिवानी गुप्ता यांच्या नावावर बनावट प्रोफाइल बनवून त्याने दोन हजाराहून अधिक महिलाना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून त्रास दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Benefits: हिवाळ्यात खा पाण्यात भिजवलेले बदाम , मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा फास्ट

Ladki Bahin Yojana: 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? खर्च सरकारला परवडेना? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडीवर?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

SCROLL FOR NEXT