महिलांच्या आरोग्याची काळजी, धूरमुक्त स्वयंपाकघर असा प्रचंड गाजावाजा करत १० वर्षांपूर्वी उज्ज्वला गॅस योजना सुरू झाली. पण याच उज्ज्वला गॅसधारक लाभार्थ्यांच्या डोळ्यातून चूल न पेटवताही पाणी यायला सुरुवात झालीये. त्याला कारण ठरलंय, या योजनेला सरकारने लावलेली कात्री! आधी ज्या ९ सिलिंडरवर हक्काचं अनुदान मिळायचं, ते अनुदान आता वर्षाला केवळ ४ सिलिंडरपुरतच मर्यादित करण्यात आलंय. देशात आधीच पेट्रोल-डिझेल टंचाई, गॅस टंचाई, कॅश टंचाई आणि महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना, सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेलाच कसा सुरुंग लावण्यात आलाय पाहूयात...
उज्ज्वला योजनेला कात्री
आता वर्षाला 9 ऐवजी केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान
पहिल्या 4 सिलेंडरवर केंद्र सरकार प्रत्येकी 300 रुपये अनुदान देणार
लाभार्थ्यांना 642 रुपयांमध्ये वर्षाला केवळ 4 सिलेंडर
4 हून अधिक सिलेंडर लागल्यास लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम म्हणजे 942 रुपये मोजावे लागणार
देशातील 10.55 कोटी लाभार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांना सर्वाधिक फटका
देशभरात वाढलेल्या महागाईनं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलेलं असतांना आता केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या नियमात इतका मोठा बदल केल्यानं लाभार्थी महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलंय...
सरासरी घरगुती वापर लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचा एक अजब दावा सरकारकडून केला जातोय. ही सुधारित मर्यादा उज्ज्वला लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक गॅस वापराच्या जवळपास असल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण या दाव्यांवर विरोधी नेत्यांनी कसा हल्लाबोल केला पाहा,
सरकारी योजनेला भुलून अनेकांनी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला खरा, पण आता या योजनेला कात्री लागल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात महिन्याला किती गॅस मिळणार, हे पाहिलं तर तुम्हालाही गरगरायला होईल.. पाहा सरकारी गॅसचं गणित
वर्षभरात 14.2 किलोचे अवघे 4 सिलेंडर मिळणार.
3 महिन्याला 14.2 किलोचा केवळ 1 सिलेंडर हातात पडणार.
महिन्याला साधारणपणे फक्त 4.8 किलो गॅस वाट्याला येणार.
म्हणजे महिन्याला 5 किलोच्या लहान सिलेंडरपेक्षाही कमी गॅस मिळणार
उज्ज्वला गॅस योजनेचे देशात साडे दहा कोटी पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. त्यामुळे इतक्या कमी गॅसमध्ये महिनाभर जेवण कसं करायचं असा सवाल या कोट्यावधी महिलांना पडलाय. गेमचेंजर ठरलेल्या या उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांनी आपली चूल मोडून अत्यंत आनंदाने गॅस घरी आणला होता. पण अवघ्या १० वर्षांतच याच कोट्यवधी उज्ज्वला लाभार्थ्यांना पुन्हा गॅस सोडून चूल फुंकायला लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.