पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्ष म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते (विरोधक) अपयशी ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे. तसेच नाव न घेता त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तेच प्रॉडक्ट पुन्हा-पुन्हा लॉन्च केल्यामुळे काँग्रेसला दुकान बंद करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुमच्यापैकी अनेकांनी (विरोधकांनी) निवडणूक लढवण्याची हिंमत गमावल्याचे मला दिसत आहे. मागच्या वेळीही काही जागा बदलल्या होत्या, मी ऐकले आहे की यावेळीही अनेकजण जागा बदलण्याचा विचार करत आहेत. आता अनेकांना लोकसभेऐवजी राज्यसभेवर जायचे आहे, असेही ऐकायला मिळते. ते परिस्थितीचे आकलन करून मार्ग काढत आहेत.'' (Latest Marathi News)
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, "पुन्हा पुन्हा तेच प्रॉडक्ट लॉन्च काँग्रेस आपलं दुकान बंद करण्याच्या टप्प्यावर आली आहे. काँग्रेसने संसद भंग संस्कृतीला चालना दिल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूजी यांची विचारसरणी होती की, भारतीय हे संथ गतीने काम करणारे कामगार आहेत.'' पंतप्रधान संसदेत म्हणाले, "2014 मध्ये भारत ही 11वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत ही 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तरीही ते (काँग्रेस) गप्प आहेत. स्वप्न पाहण्याची क्षमताही त्यांनी गमावली आहे. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत ही तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल याची मोदींची गॅरंटी आहे."
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.