Narendra Modi  Saam tv
देश विदेश

PM Narendra Modi : आता काँग्रेस देशाचं मन मारत आहे; मणिशंकर यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर 'अॅटमबॉम्ब' च्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे. ओडिशातील कंधमाल येथील प्रचारसभेत संबोधित करताना काँग्रेसवर निशाणा साधला. जिंवतपणी मेलेले हे लोक देशाचं मन मारत आहेत. काँग्रेस लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस देशाचं मन मारत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी पोखरणमध्ये अणुबॉम्बची चाचणी केली होती. देशाच्या सुरक्षेसाठी भाजप हितामध्येच काम करत आहे. दुसरीकडे काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेस सातत्याने देशातील लोकांना घाबरवण्याचं काम करत आहे'.

'काँग्रेसचे लोक देशाचं मन मारत आहेत. काँग्रेसची अशीच नीती असते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे गेल्या ६० वर्षांत दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला. देशाने किती दहशतवादी हल्ले झेलले आहेत, असे ते म्हणाले.

'मुंबईतील २६/११ हल्ल्यानंतर या लोकांची हिंमत झाली नाही. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला वाटतं की, आम्ही कारवाई केल्यावर त्यांची व्होटबँक नाराज होईल, अशा शब्दात मोदींनी टीका केली.

मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते?

मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, भारताने पाकिस्तानला आदर केला पाहिजे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यांचा आदर केला नाही, तर ते भारतावार हल्ला करतील',

'भारताने हे विसरलं नाही पाहिजे, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. पाकिस्तानातील दहशतवाद संपविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. पाकिस्तानमध्ये कोणताही वेडा हा या अणुबॉम्बचा वापर करू शकतो, असे ते म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT