PM Narendra Modi On The Kerala Story in Karnataka Elections Rally Saam TV
देश विदेश

The Kerala Story : निवडणूक कर्नाटकची, चर्चा 'द केरल स्टोरी'ची; PM मोदी म्हणाले, ही एकाच राज्याची...

PM Narendra Modi On The Kerala Story : टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादात असलेल्या 'द केरल स्टोरी' चित्रपटाचा मुद्दा आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित झाला आहे.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi On The Kerala Story : टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादात असलेल्या 'द केरल स्टोरी' चित्रपटाचा मुद्दा आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बल्लारीमध्ये प्रचारसभेतील उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 'जय बजरंग बली'ने भाषणाची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी द केरल स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख केला. द केरल स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली जावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे, असे मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

द केरल स्टोरीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'काँग्रेसकडून दहशतवादी प्रवृत्तींशी राजकीय सौदा केला जात आहे. सध्याच्या घडीला द केरल स्टोरीची जोरदार चर्चा सुरूय. या चित्रपटातून दहशतवादी कटाचा पर्दाफाश केलाय. काँग्रेस आता यावरून राजकारण करत आहे.'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता काँग्रेसचा हेतू माहीत आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण ही जनता सगळं ओळखून आहे. जनतेला काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे.'

काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. राज्याला क्रमांक १ वर न्यायचं असेल तर, कायदा आणि सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्नाटकाला दहशतवादमुक्त करणे तितकेच गरजेचे आहे. भाजप दहशतवादाच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहे. ज्या ज्या वेळी दहशतवादाविरोधात कारवाई झाली, त्यावेळी काँग्रेसच्या पोटात दुखू लागतं. व्होट बँकेमुळे काँग्रेस दहशतवादावर चकार शब्दही काढत नाही. काँग्रेसनेच दहशतवाद पोसला आहे, असा हल्ला मोदींनी चढवला.

'द केरल स्टोरी एकाच राज्याची स्टोरी नाही'

बहुचर्चित द केरल स्टोरीच्या मुद्द्यावरही मोदींनी यावेळी भाष्य केले. बॉम्ब-बंदूक आणि पिस्तुलाचा आवाज तर ऐकू येतो. पण समाजाला पोखरणाऱ्या दहशतवादी कटाचा आवाज कुणालाही ऐकायला जात नाही. म्हणूनच कोर्टानेही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. दहशतवादी कटाचा पर्दाफाश करणारा चित्रपट द केरल स्टोरी आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे, असे मोदी म्हणाले.

द केरल स्टोरी केवळ एका राज्यातील दहशतवादी कटावर आधारीत नाही. ही केवळ एका राज्याची स्टोरी नाही. मेहनती, गुणवान आणि बुद्धिमान लोक ही या राज्याची ओळख आहे, पण कशा पद्धतीने दहशतवादी कट केरळमध्ये पोसला गेला हे या सिनेमात सांगितलंय. दहशतवादी कटाचा पर्दाफाश या चित्रपटातून केला गेला आहे, असे मोदींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil : निवडणुकीची पद्धत बदलली, आमिषाला बळी पडू नका; जयंत पाटील यांचा निशाणा

Yashomati Thakur : मला ब्लॅक करतोय, २५ लाखांची मागणी; यशोमती ठाकूरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर खळबळजनक आरोप

Delhi Politics : दिल्लीत 'आप'ला मोठा झटका; बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

SCROLL FOR NEXT