Narendra Modi Speech Saam tv
देश विदेश

Narendra Modi Speech : काँग्रेस, घराणेशाही, लोकशाही, विरोधक....लोकसभेत PM नरेंद्र मोदींचे तुफान भाषण, VIDEO

Narendra Modi latest news: 'काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण त्यांनी चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

Narendra modi Speech in Loksabha News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण त्यांनी चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी काँग्रेस, घराणेशाही, लोकशाही, विरोधक या मुद्द्यांवरूनही पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणातील ठळक मुद्दे

१) काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास गमावला आहे. मागच्या वेळी अनेक लोकांनी मतदारसंघ बदलला होता. यावेळी देखील मतदारसंघ बदलण्याचा विचार करत आहेत.

२) तुम्ही केव्हापर्यंत लोकांचे विभाजन करणार आहेत. लोकसभेत जाता जाता काही सकारात्मक चर्चा व्हायला हवी होती. मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांनी निराश केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३) निवडणुकीत काही मेहनत घेतली असती, जनतेला काही संदेश दिला असता. पण यातही तुम्ही अयशस्वी झालात. विरोधकांची ही परिस्थिती काँग्रेसमुळे झाली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही. लोकसभेतील अनेक खासदारांनी त्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही.

४) देशातील घराणेशाहीचा फायदा काँग्रेसने घेतला. आमचे मल्लिकार्जुन खरगे हे एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात गेले. गुलाब नबी आजाद यांनी पक्षाला रामराम केला. हे सर्व घराणेशाहीमुळे झालं.

५) देशात काही पक्ष घराणेशाही चालवत आहेत. पक्षाचे सर्व निर्णय कुटुंबाकडून घेतले जातात, त्याला घराणेशाहीला म्हणतात. राजनाथ सिंह , अमित शहा कोणीही पक्ष चालवत नाही. देशातील कौटुंबीक पक्ष चिंतेचा विषय आहे.

६) भारताच्या अर्थव्यवस्थेची जगभरात कौतुक होत आहे. भारताची अर्थव्यवस्थेकडे पाहता तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी ठरेल. ही मोदींची गॅरंटी आहे

७) एका मोठ्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले की, आपला देश ३० वर्षानंतर अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर पोहोचेल. या अर्थ आपला देश २०४४ सालापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. मी तुमच्या विश्वासाने उभा आहे की, तसेच विश्वासाने सांगतो की, आम्ही ३० वर्ष लागू देणार नाही. माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT