Rahul Gandhi, PM Narendra Modi On China New Map Issue SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News : PM मोदींनी चीनवर बोलावं; राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

China New Map Issue : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi Statement On China New Map : चीनच्या कुरापती सुरूच असून, नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'मानक' नकाशाच्या अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशावर दावा केला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. चीनच्या या कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी बोलायला हवं, असं राहुल म्हणाले.

चीनने सोमवारी मानक नकाशा प्रसिद्ध केला. त्यात अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशावर दावा आहे. भारताच्या भूभागावर त्यांनी दावा केला आहे. दक्षिण चीन महासागराचा काही भाग चीनचा असल्याचेही नकाशात दाखवण्यात आले आहे.

चीनच्या या कुरापतीवरून राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर काहीतरी बोललं पाहिजे. लडाखमधील एक इंच जमीन गेली नाही असे पंतप्रधान सांगत आहेत ते खोटे आहे हे मी अनेक वर्षांपासून सांगत आहे. चीनने अतिक्रमण केलंय हे अख्ख्या लडाखला माहीत आहे. चीनने प्रसिद्ध केलेला मानक नकाशाचा मुद्दा खूपच गंभीर आहे, असे राहुल म्हणाले.

तत्पूर्वी, चीनला अशा प्रकारचे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. या नकाशाला काहीही अर्थ नाही, असं सडेतोड उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला दिले.

चीनने त्यांच्या नसलेल्या भूभागांसह मानक नकाशा प्रसिद्ध केला आहे. ही त्यांची जुनी सवय आहे. भारताचा काही भूभागाचा समावेश असलेला नकाशा प्रसिद्ध करून काहीही बदलणार नाही. तथ्य नसलेले दावे करून इतरांचा भूभाग आपला होत नाही, असं जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT