PM Modi In Cabinet Meeting 
देश विदेश

Bjp Cabinet Meeting: केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने दिला राजीनामा; मोदी म्हणाले,जय-पराजय हा राजकारणाचा भाग

Modi cabinet Resignation : जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे. निवडणुकीच्या राजकारणात आणि निकालांमध्ये आकड्यांचा खेळ सुरू असतो, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवडणूक निकालांवरही चर्चा झाली. या बैठकीत लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली आणि पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. या बैठकीत बोलताना मोदी म्हणाले, आकड्यांचा खेळ सुरूच असतो. जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे.

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रपती भवनात गेले. राष्ट्रपती मूर्मू यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राजीनामा दिला. सत्तास्थापने संदर्भात आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. या बैठकीत एनडीए सरकारच्या स्वरूपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पोहोचलेत. ललन सिंग आणि संजय झा हेही त्यांच्यासोबत आहेत.

आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळालेले चंद्राबाबू नायडूही काही वेळातच दाखल होणार आहेत. या बैठकीत मित्रपक्षांकडून पाठिंब्याची पत्रे घेतली जाणार आहेत. त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, दरम्यान, चंद्राबाबू नायडूंनी किमान ४ मंत्रालयांची मागणी केलीय. याशिवाय नायडू यांचाही लोकसभा अध्यक्षपदावर डोळा आहे. नितीश कुमार यांचीही अशीच मागणी आहे. याशिवाय राज्यात ६ महिन्यांत विधानसभा निवडणुका व्हाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. नितीश कुमार आणि अशाप्रकारे नरेंद्र मोदींसोबत अवघड समझोता करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत आहेत. सलग १० वर्षे पूर्ण बहुमताने सरकार चालवल्यानंतर भाजपला यावेळी पूर्ण बहुमत मिळालेले नाही, अशा स्थितीत त्याला मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT