PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Narendra Modi: भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार, एनडीएला पुन्हा बहुमत मिळणार; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

PM Narendra Modi News: भाजपने सलग दोन वेळा लोकसभेतील बहुमताचा वापर देशाला बळकट करण्यासाठी केला, तर काँग्रेसने आपल्या 'कुटुंब' बळकट करण्यासाठी दशकभर जुने बहुमत वापरले, अशी टीकाही मोदींनी केली आहे.

Satish Daud

Narendra Modi Latest News

ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भाजप तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षांना संपवण्याचं काम करीत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या गुलाम झाल्या असून ईडी कारवायांचा धाक दाखवून विरोधकांना कमजोर केलं जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा केला आहे. भाजपने सलग दोन वेळा लोकसभेतील बहुमताचा वापर देशाला बळकट करण्यासाठी केला, तर काँग्रेसने आपल्या 'कुटुंब' बळकट करण्यासाठी दशकभर जुने बहुमत वापरले, अशी टीकाही मोदींनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान या हिंदी वृत्तपत्राला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलं. देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल आणि विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेते जेलमध्ये जातील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ईडीबाबत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलली जात आहेत".

"अंमलबजावणी संचालनालयाने तपासलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी केवळ तीन टक्के प्रकरणांमध्ये राजकारणाशी संबंधित लोकांचा समावेश आहे. उर्वरित ९७ टक्के प्रकरणे अधिकारी आणि गुन्हेगारांशी संबंधित आहेत. ज्यांना भ्रष्ट व्यवस्थेत फायदा दिसतो ते लोकांसमोर चुकीचे चित्र मांडत आहेत. २०१४ पासून एनडीएचे सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचार कमी झाला", असंही मोदींनी सांगितलं आहे.

"गरिबांचा पैसा मध्यस्थांच्या खिशात जाण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही डीबीटी (थेट लाभ योजना) लागू केली. याचा परिणाम असा झाला की आम्ही 10 कोटींहून अधिक बनावट लाभार्थ्यांची नावे कागदपत्रांमधून काढून टाकली, ज्यांचा जन्मही झाला नव्हता. अशा प्रकारे सरकारने २२.७५ लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवले", असंही मोदी म्हणाले.

"२०१४ पूर्वी ईडीने केवळ २५,००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, तर गेल्या १० वर्षांत ही जप्ती १ लाख कोटींहून अधिक झाली आहे. मी लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की, या देशातील लोकांच्या कल्याणासाठी पैसा चोरणाऱ्या अशा लोकांविरुद्ध कारवाई थांबवली जाणार नाही. एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास विरोधकांनाही आहे", असा चिमटाही मोदींनी काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT