PM Modi Death Threat saam tv
देश विदेश

PM Modi Death Threat: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

PM Narendra Modi Death Threat: पंतप्रधान नरेंद्र मोदी९ जुलै रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. मेलबर्नमध्ये एक सामुदायिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्याच कार्यक्रमात मोदींवर हल्ला होऊ शकतो, अशी धमकी आल्यानं ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.

Bharat Jadhav

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत.

  • सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली.

  • ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस (AFP) या प्रकरणाचा तपास करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पंतप्रधान मोदींना धमकी येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे मेलबर्नमध्ये 'मेलबर्न मीट्स मोदी' (Melbourne Meets Modi) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच कार्यक्रमासंदर्भात सोशल मीडियावर त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

याप्रकरणी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी (AFP) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मेलबर्नच्या 'मार्व्हल स्टेडियम'वर आयोजित एका सामुदायिक कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी केलेल्या फेसबुक पोस्टखाली ही धमकी देण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातोय.

फेसबूकवर आली धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, 'अबू मुस्तफा' नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून एक धमकीची कमेंट करण्यात आली होती. यात म्हटले होते की, "कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंद राहिले तरच बरे होईल; अन्यथा, ऑस्ट्रेलिया इथे आपला मृत्यू ओढवून घेण्यासाठी येत आहे." ही पोस्ट समोर येताच हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

तपास यंत्रणेकडून आयपी (IP) ॲड्रेसचा शोध सुरू

मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी सोशल मीडियावरील पोस्टशी संबंधित आयपी (IP) ॲड्रेस शोधून काढला आहे. आता ती कमेंट कोणी केली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा शोध घेतला जातोय. तसेच, या प्रकरणात कोणत्याही फौजदारी कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही तपासणी अधिकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT