RT-PCR Test Saam Tv
देश विदेश

RT-PCR Test: मंत्री, कार्यकर्ता कोणीही असो, पीएम मोदींना भेटायचंय तर RT-PCR टेस्ट अनिवार्य

RT-PCR Test Mandotory before PM Modi Meet: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पीएम मोदींना भेटण्यापूर्वी सर्वांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे.

Siddhi Hande

देशभरात कोरोना पुन्हा पसरताना दिसत आहेत. हजारो नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेतला पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट करावी लागणार आहे. ही टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे, याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.

पीएम मोदींची आज पदाधिकाऱ्यांशी भेट

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी अनेक पदाधिकारी येणार आहे. त्यांच्या निवासस्थानी ७० भाजप पदाधिकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री, सात खासदार आणि आमदार भेटण्यासाठी येणार आहे. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. असं सांगण्यात येत आहे.

दिल्ली विधानसभेतील भाजपच्या विजयानंतर पहिल्यांदाच राज्यातील पक्षनेते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. त्यांना संध्याकाळी ७.३० वाजता जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोंदीची भेट घेण्यापूर्वी सर्वांना कोविड टेस्ट करावी लागणार आहे.

देशात ७००० कोविड रुग्ण

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या २४ तासांत देशात ३०६ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एक तर कर्नाटकमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ७००० कोविडचे रुग्ण आढळले आहेत.

देशातील कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पीएम मोदींना भेटण्यापूर्वी सर्वांना आरटी-पीसीआर टेस्ट करायची आहे. आतापर्यंत ७० पदाधिकाऱ्यांनी ही टेस्ट केली आहे. त्यानंतरच त्यांना मोदींना भेटता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

Kharghar Tourism : वीकेंडला थेट पनवेल गाडी पकडा अन् 'खारघर' ला पोहचा, पाहा 'ही' निसर्गरम्य ५ पर्यटन स्थळे

Weight Loss Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Crime news: पत्नीचं दुसरीकडे अफेअर, पतीची दिली सुपारी; नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजून प्रियकराला केले १०० पेक्षा जास्त फोन आणि...!

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT