Pm Modi Saam Tv
देश विदेश

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा मोरया! पीएम मोदींनी देशवासियांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी देखील देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर गणरायचा फोटो शेअर करत देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे.

ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे.सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. त्यामुळे आता पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. ठिकठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना व सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.

हे देखील पाहा -

पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे अभिनंदन केले

यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः। यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।। गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

द्रोपदी मुर्मु यांनीही दिल्या शुभेच्छा

देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी देखील देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्यांनी सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ट्विट करत त्या म्हणाल्या की, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती भगवान गणेश हे ज्ञान, सिद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहेत. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा संचार होवो हीच सदिच्छा अशा त्यांनी शब्दात देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT