Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

'काही निर्णय चांगले वाटणार नाहीत, पण...'; 'अग्निपथ' योजनेवर मोदींची पहिली प्रतिक्रिया

अग्निपथ योजनेविरोधात देशभरात वातावरण तापलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अग्निपथ योजनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बंगळुरू : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' या लष्कर भरती योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात काही संघटनांकडून आज सोमवारी देशभर 'भारत बंद' (Bharat Bandh) आंदोलन करण्यात आलं आहे. या भारत बंदचा परिणाम देशभर पहायला मिळत आहे. आंदोलकांनी काही ठिकाणी रेल्वे गाड्या अडवल्या आहेत. या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणची इंटरनेटसेवा (Internet) प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेविरोधात देशभरात वातावरण तापलं आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अग्निपथ योजनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( Narendra Modi News In Marathi )

आज कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अग्नीपथ योजनेवर भाष्य केलं. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, 'काही निर्णय आणि सुधारणा अनेकांना चांगले वाटणार नाहीत. पण याचा लाभ संपूर्ण देशाला मिळेल'.

पुढे कर्नाटकच्या प्रकल्पावर नरेंद्र मोदी म्हणाले, 'दोन इंजिनच्या सरकारने कर्नाटकाच्या विकासावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाचे आपण पुन्हा एकदा साक्षीदार होत आहोत. आज २७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि पायाभरणी होत आहे. कर्नाटकात पाच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प आणि ७ रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आज होत आहे.कोकण रेल्वेच्या शत-प्रतिशत विद्य्युतीकरणाचे आपण साक्षीदार होत आहात. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटकमधील युवा, मध्यम वर्ग, शेतकरी, कष्टकरी , उद्योजकांना नवीन सुविधा आणि नवी संधी उपलब्ध होणार आहे'.

प्रधानमंत्री पुढे म्हणाले,' तुम्हाला आश्चर्य वाटेल की, १६ वर्षांपासून या प्रकल्पाच्या फाईल रखडल्या होत्या. आता मला आनंद होत आहे की, डबल इंजिनच्या सरकारने कर्नाटक आणि बंगळुरूमधील जनता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला लागली आहे. बंगळुरूमधील जनतेला ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी कर्नाटक सरकार रेल्वे, रोड, अंडरपास, फ्लायओवर अशा सर्व माध्यमातून काम करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

Maharashtra Live Update: लातूर बार्शी महामार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी

Railway Recruitment: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत नोकरीची संधी; २४१८ पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT