PM Modi Feeds Cows Saam Digital
देश विदेश

PM Modi Feeds Cows: मकर सक्रांतीच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी गायींची केली सेवा, अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा

PM Modi Feeds Cows Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गायींवरचं प्रेम सर्व जागाला ज्ञात आहे. दरम्यान उद्या म्हणजेच १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो समोर आले आहेत.

Sandeep Gawade

PM Modi Feeds Cows

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गायींवरचं प्रेम सर्व जागाला ज्ञात आहे. दरम्यान उद्या म्हणजेच १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ते गायींना चारा देताना दिसत आहेत. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला येतात. या सणाशी सूर्य आणि शनीचा संबंध असल्याने या सणाला खूप महत्त्व आहे. दरम्यान नरेंद्र मोदींनी हे फोटो शेअर करण्यासोबतच देशवासीयांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींचे गायींवरचे प्रेम आणि त्यांची गायींची सेवा पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी जेव्हा ते वारंगल शहरातील भद्रकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा ते गायींची सेवा करताना दिसले होते. यावेळी त्यांनी गोठ्यातील गायींना गवत व चारा दिला घातला होता. पंतप्रधान मोदींसोबत मंदिराच्या पुजाऱ्यांनीही गायींना चारा दिला. गाईची सेवा करून त्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. दरम्या मोदींनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफार व्हायरल होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कामराज लेन (Delhi) येथील मुरुगन यांच्या शासकीय निवासस्थानी पोंगल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजनही उपस्थित होत्या. पोंगलमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पूर्णपणे दक्षिण भारतीय पारंपारिक पोशाखात दिसले. त्यांनी पूर्ण विधीपूर्वक पूजा केली. गायीला पूजन, प्रसाद खाऊ घातला आणि फुलांचा हारही घालण्यात घातला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT