PM Kisan : PM नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे  Saam Tv
देश विदेश

PM Kisan : PM नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा ९ वा हफ्ता हा उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा ९ वा हफ्ता हा उद्या जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी ९ ऑगस्ट दिवशी दुपारी १२: ३० वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे video conferencing पीएम Pm किसान निधीची घोषणा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

पीएम किसान निधी योजनेंतर्गत १९,५०० कोटी रुपये ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या farmers खात्यामध्ये account जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता मदतीचा नवा हफ्ता ९ ऑगस्ट दिवशी दुपारी १२: ३० वाजता जाहीर करणार आहेत. यामुळे ९.७५ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १९,५०० कोटी रुपये जमा होणार आहेत, असे अधिकृत निवेदनामध्ये सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा-

पीएम- किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जात आहे. ४ महिन्यामध्ये एकदा अशी ३ हफ्त्यात ही रक्कम दिली जाणार आहे. पीएम- किसान योजनेंतर्गत आतापर्यंत १.३८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. याअगोदर मे महिन्यामध्ये ९ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात आली आहे.

पीएम- किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक नोडल अधिकाऱ्याकडे जाऊन शेतकरी या योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकणार आहेत. लाभार्थी कोणाला ठरवायचे याबाबत निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आलेला आहे. लाभार्थींची यादी केंद्र सरकारकडे यावेळी पाठवण्यात आली आहे. यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ऑगस्ट दिवशी देशाला संबोधित करणार आहेत, आणि काही लाभार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक व्यवसायांना फटका बसलेला आहे. शेती क्षेत्र देखील यातून सुटू शकलेले नाही. या काळामध्ये पीएम- किसान योजनेच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली गेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde : महायुतीतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? पंकजा मुंडे थेट बोलल्या

Maharashtra News Live Updates: पूजा खेडकर प्रकरण सुनावणी अपडेट : दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर आली, तरूणही भुलला, टप्प्याटप्प्याने पुढे घडलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली!

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT