Rahul Gandhi Vs Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Narendra Modi: घराणेशाहीमुळे देश उद्ध्वस्त झाला, तेलंगणातून PM मोदींचा विरोधकांवर जोरदार प्रहार

PM Modi Telangana Sabha: घराणेशाहीमुळे देश उद्ध्वस्त झाला असून जम्मू-काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत फक्त घराणेशाहीचीच सत्ता आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.

Satish Daud

PM Naredra Modi News

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुक आयोगाकडून आचारसंहितेची घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक राज्यांमध्ये दौऱ्याला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा तेलंगणामध्ये पोहोचले आहेत.

मंगळवारी त्यांनी सर्वप्रथम सिकंदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात पूजा केली. यानंतर त्यांनी संगारेड्डीमध्ये ७ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर प्रहार केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घराणेशाहीमुळे देश उद्ध्वस्त झाला असून जम्मू-काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत फक्त घराणेशाहीचीच सत्ता आहे. अनेकांनी जमीनी विकून आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत, असं टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांवर डागलं.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

"आज मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात व्यस्त आहे. पण दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मला आणि माझ्या कुटुंबाला शिव्या घालत आहेत. याचे कारण मी त्यांचे लाखो रुपयांचे घोटाळे उघड करत आहे",असं मोदींनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

"सत्तेत असताना विरोधकांनी भ्रष्टाचारासाठी जमीन-आकाश विकून आपले वाडे बांधले. मी आजपर्यंत माझे घरही बांधले नाही. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना 150 कोटी रुपयांच्या भेटवस्तूंचा लिलाव करून त्या पैशांचा वापर जनतेच्या सेवेसाठी केला होता", अशी आठवणही मोदींनी करून दिली.

"सध्या अनेक राज्यात घराणेशाहीची सत्ता आहे. कुटुंब असल्यामुळे त्यांना चोरी करण्याचे स्वातंत्र आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. मी त्यांचे लाखो रुपयांचे घोटाळे उघड करत आहे. म्हणून ते माझ्यावर टीका करत आहेत", असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेचाही चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत. अशी घणाघाती टीका लालू प्रसाद यादव यांनी केली होती. यावर देशातील १४० कोटी लोक माझे कुटुंब आहे, असं उत्तर मोदींनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT