"सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या दिल्या तरी येड्यागबाळ्यांसमोर झुकणार नाही"- संजय राऊत Saam Tv
देश विदेश

Sanjay Raut:"सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या दिल्या तरी येड्यागबाळ्यांसमोर झुकणार नाही"

महाराष्ट्र येड्या गबाळ्यांसोर झुकणार नाही असे म्हणत संजय राऊत यांनी परत एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: माझी पुढची भूमिका ही मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये स्पष्ट करणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले आहेत. भयापोटी आमच्यामागे राक्षस लावले जात असल्याचचे ते म्हणाले आहेत. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या, सरकार पडणार नाही. आणि जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा देखील आहेत, अससे संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, बोलण्याचा अधिकार दिला असेल एखाद्या सरकारने तर या देशाचा नागरिक म्हणून, संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मला देखील एक बाजू म्हणून लोकांसमोर सत्य मांडण्याचा अधिकार आहे. मला जे काही बोलायचे होते, ते मी बोललो. यापुढे जे काही बोलायचे आहे, ते मी महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबई शहरात जाऊन बोलणार आहे.

हे देखील पहा-

दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकणार नाही. मुंबईला ओरबाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या सर्व गोष्टींवर आपण कोर्टात बोलणार आहे. संसदेमध्ये देखील आपण याविषयी बोलणार आहोत असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान पंतप्रधान आहेत, त्यांच्या अगोदर कोणी पंतप्रधान नव्हते आणि त्यांच्यावर देखील होणार नाहीत असे वाटत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले आहेत.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यामध्ये नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. ही मुंबई आहे. या मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची दादागिरी बघाच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT