Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Narendra Modi: PM मोदींना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? चर्चांनंतर पुरस्कार समितीच्या उपाध्यक्षांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

PM Modi Being Considered As Nobel Prize: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nobel Prize Commitee: गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नोबेल पारितोषिक समितीचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आल्या होते. यावेळी अस्ले तोजे यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. ज्यानंतर या बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्या चर्चांनंतर आता नोबेल पारितोषिक पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे (Asle Toje) यांनी स्पष्टिकरण दिले आहे.

संबंधित बातम्या खोट्या असून नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत, असं आपण म्हटलो नाही, असं ते म्हणाले आहेत.

याबाबत बोलताना ते म्हणाले की,"आपण त्या सर्व बातम्यांना बनावट बातम्या मानलं पाहिजे. ती खोटी बातमी आहे, त्यावर आपण चर्चा करून खोट्या बातमीला हवा-पाणी द्यायला नको. संबंधित ट्विटमध्ये जे काही लिहिलं होतं, तसं मी काहीही बोललो नाही. ट्विटमधील विधान मी स्पष्टपणे नाकारतो.” अशी प्रतिक्रिया त्यांनी केली आहे.

तोजे यांच्या या स्पष्टिकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पारितोषिक मिळण्याच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे. तत्पुर्वी त्योजे यांच्या वक्तव्यामुळेच या सर्व चर्चा सुरू झाल्या होत्या.

काय म्हणाले होते तोजे...

नोबेल पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेचं कौतुक केले होते. नोबेल समितीचे उपाध्यक्ष अस्ले तोजे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची खूप आवश्यकता आहे.” (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT