PM Narendra Modi Saamtv
देश विदेश

PM Narendra Modi: 'राम आग नव्हे, ऊर्जा आहे; राम भारताची प्रतिष्ठा...' PM मोदींचा देशवासियांना खास संदेश

Ram Mandir Inauguration: पवित्र सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Gangappa Pujari

PM Narendra Modi Speech:

अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या देश आज 'राममय' झाला असून राजनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत आहे. या पवित्र सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

आपले राम आता तंबूत राहणार नाहीत...

"अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आपला राम आला आहे. या शुभप्रसंगी मी देशवासियांना शुभेच्छा देतो. माझं शरीर अजूनही त्या क्षणांमध्ये गढून गेले आहे. आपले राम आता तंबूत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळी म्हणाले. यावेळी काही क्षण पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.

प्रभूरामांची माफी मागतो..

"मी प्रभू श्रीराम यांच्यापुढे आज नतमस्तक होतो. त्यांची माफी मागतो. आमच्या त्याग, तपस्येमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील. कारण इतक्या वर्षात हे काम झाले नाही. मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्याला नक्की माफ करतील," अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राम भारताची प्रतिष्ठा

"काही लोक म्हणत होते राम मंदिर तयार झालं तर भारतात आग लागेल. असे लोक भारताचा सामाजिक भाव समजू शकले नाहीत. राम मंदिराची उभारणी कुठली आग नाही, तर एक ऊर्जा निर्माण करत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम उपाय आहे, वाद नाही, राम ही आग नाही तर उर्जा आहे, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे, "असेही पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT