Jarange Patil Kids on Protest: मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंच्या मुलांना काय वाटतं? म्हणाले, बाबांसोबत भेट होते ती...

Maratha Aarakshan Mumbai morcha: बाबांसोबत भेट होते ती आंदोलक म्हणूनच. आंदोलनापूर्वी आमचा परिवार छोटा होता. आता प्रत्येक कार्यकर्ता आमच्या परिवाराचा भाग झाल्याने आमचा परिवार मोठा झालाय असं शिवराज म्हणतोय.
Jarange Patil Kids on Protest
Jarange Patil Kids on ProtestSaam TV
Published On

तुषार ओव्हाळ

Jarange-Patil March to Mumbai:

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलंय. जरांगे पाटील आता आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेत. जरांगे पाटील मुंबईसाठी निघालेत पण त्यांच्या मुलांना आपल्या वडिलांची काळजी वाटतेय.

Jarange Patil Kids on Protest
KS Bharat Century: केएस भरतचं शतक प्रभू श्री रामांना समर्पित! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी केलं हटके सेलिब्रेशन; Video

एका मराठी वृत्तपत्राला जरांगे पाटील यांच्या मुलांनी मुलाखत दिली आहे. जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज हा जालन्यात कॉम्पुटर इंजिनीअरिंग शिकतोय. शिवराज म्हणाला की, बाबा मराठा आरक्षणासाठी लढा उभारत आहेत हे आंदोलकांकडून कळालं. आता बाबांसोबत भेट होते ती आंदोलक म्हणूनच. आंदोलनापूर्वी आमचा परिवार छोटा होता. आता प्रत्येक कार्यकर्ता आमच्या परिवाराचा भाग झाल्याने आमचा परिवार मोठा झालाय असं शिवराज म्हणतोय.

बाबा जेव्हा मुंबईसाठी निघाले तेव्हा आम्ही खूप भावुक झालो होतो, असं शिवराजने सांगितलं. पण बाबांची तब्येत बिघडते तेव्हा काळजी वाटते असंही शिवराजने सांगितलं. मुंबईला जाण्याबद्दल शिवराज म्हणाला की, आम्ही मुंबईला जाण्याचं अजून ठरवलं नाही. पण घरची जबाबदारी पाहून निर्णय घेऊ असं शिवराज म्हणालाय.

जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी सध्या शाळेत शिकते. मुंबईत यायला बाबा नाही म्हणाले असं पल्लवीने सांगतलं. पण पुढे सरकारला आरक्षण द्यावच लागेल असं पल्लवी म्हणाली. सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केलाय. बाबा मुंबईत पोहोचेपर्यंत आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही, असा इशाराच पल्लवीने दिलाय.

जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलीये. मोठ्या प्रमाणात त्यांना मराठा समाज येऊन आंदोलनात सहभागी होतोय. त्यामुळे आता जरांगे मुंबईत येण्यापूर्वी मराठा आरक्षण मिळणार की मुंबईत आंदोलन झाल्यानंतर आरक्षणाचा तिढा सुटणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणारे.

Jarange Patil Kids on Protest
CCTV Footage : महिलेने ऑटो राईड रद्द केली, संतापलेल्या रिक्षाचालकाची महिलेला मारहाण; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com