PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi: न्यूक्लियरच्या धमक्यांना भीक घालणार नाही, सडेतोड उत्तर देऊ; पीएम मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi Warns Pakistan: न्यूक्लियरच्या धमक्यांवरून पीएम मोदी यांनी थेट लालकिल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. न्यूक्लियरच्या धमक्यांना भीक घालणार नाही, सडेतोड उत्तर देऊ.', असे त्यांनी पाकिस्तानला सांगितले.

Priya More

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिंरगा फडकावत देशाला संबोधित केले. यावेळी पीए मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरपासून ते सिंधू पाणी करार आणि पाकिस्तानच्या न्यूक्लियर धमक्यांपर्यंत सर्वच मुद्द्यांवर भाष्य केले. पाकिस्तानने भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. यावरून संतप्त झालेल्या पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावून सांगितले. 'न्यूक्लियरच्या धमक्यांना भीक घालणार नाही. यापुढे या धमक्या सहन करणार नाही. जशात तसं उत्तर देऊ.' अशा शब्दात पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला.

पीएम मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले की, 'भारताने आता ठरवलंय न्यूक्लियरच्या धमक्यांन सहन करणार नाही. न्यूक्लियरच्या धमक्यांनी आम्ही आता भीक घालत नाही. न्यूक्लियर ब्लॅकमेल बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. आता हे ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. जर शत्रुने पुढे असेच प्रयत्न सुरु ठेवले तर आमचं सैन्य ठरवेल आणि त्यांना सडेतोड उत्तर देईल.'

पीएम मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ऑपरेशन सिंदूरच्या शूरविरांना सलाम केले. 'पाकिस्तानचे नुकसान एवढं मोठं की रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची झोप उडाली. पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश संतापला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली. देशात गेली कित्येक वर्षे झाली नाही अशी कारवाई सैन्यदलाने करून दाखवली. आम्ही सैन्य दलाला पूर्ण मुभा दिली होती. दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच आहेत. दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे वेगळे आहेत. दहशतवाद्यांना मदत कराल तर कारवाई होईल.', असे म्हणत पीएम मोदींनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपघात की घातपात? शिंदे गटाच्या माजी आमदाराला वाहनाने उडवलं|VIDEO

Maharashtra Live News Update : विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शंकराचार्य राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT