Ram Mandir Visit Saam Tv
देश विदेश

PM Modi Ram Mandir Visit : पीएम मोदींनी यात्रा केलेल्या राम मंदिरांची काय आहेत वैशिष्ट्ये?

Ram Mandir Visit: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रम उद्या होणार आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामाशी संबंधित असलेल्या मंदिरांना भेटी दिल्या. या मंदिराचे काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊ..

Bharat Jadhav

PM Modi Ram Mandir Visit :

सोमवारी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राम मंदिराची यात्रा केली. या यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक घोषणा केल्या. या यात्रेदरम्यान केलेल्या भाषणात रामाविषयी उद्गगार काढले. पंतप्रधान मोदींनी कोणकोणत्या राम मंदिरांना भेटी दिल्या याची माहिती घेऊ. (Latest News)

केरळ: गुरुवायूर आणि रामास्वामी मंदिर

पंतप्रधान मोदींनी १७ जानेवारी रोजी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील भगवान कृष्णाच्या गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केली. यानंतर ते त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात गेले. या मंदिराला दक्षिणेची अयोध्या असेही म्हणतात. रामायणातील महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करणारी भव्य नक्षीकाम या मंदिराच्या आवारातील भिंतीवर कोरण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंध्र प्रदेश - लेपाक्षी

पंतप्रधान मोदींनी १६ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराचे दर्शन घेतले. रामायणात वर्णन केल्यानुसार माता सीताला रावणापासून वाचवण्यासाठी जटायू पक्षीने रावणाशी दोन हात केले होते. त्यावेळी रावणाच्या हल्लात जटायू जखमी झाला होता. त्यावेळी जटायू पक्षी जखमी होऊ लेपाक्षी येथे पडला होता. लेपाक्षी येथे भगवान महादेव यांचे वाहन नदी देवाची मूर्तीदेखील आहे.

महाराष्ट्र काळाराम मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिराला ही भेट दिली होती. येथील प्रभू रामाचे दर्शन त्यांनी घेतले. हे मंदिर नाशिकमधील पंचवटी परिसरात आहे. रामायणानुसार, राम, लक्ष्मण, सीता हे जेव्हा वनवासात होते त्यावेळी त्यांनी नाशिकमधील पंचवटी येथे झोपडी बनवून राहत होते.

तमिळनाडू - रंगनाथस्वामी मंदिर आणि रामेश्वर

शनिवारी २० जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी तमिळनाडू येतील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगमधील श्री रंगनाथस्वामी मंदिराचे दर्शन घेतलं. या मंदिराची एक आख्यायिका आहे की, प्रभू रामांनी रावणाचा भाव विभीषणला भगवान विष्णूची मूर्ती दिली होती. विभीषण लंकेकडे जात असताना त्यांना मूर्ती रस्त्यात असलेल्या श्रीरंगम येथे स्थापित करावी लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT