PM Narendra Modi saam tv
देश विदेश

National Training Conclave: सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास वाढवणे ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी: पंतप्रधान मोदी

सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास वाढवणे ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी: पंतप्रधान मोदी

साम टिव्ही ब्युरो

National Training Conclave: नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात आयोजित पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

भारतीय लष्कराने ज्याप्रमाणे लोकांच्या नजरेत निर्दोष विश्वासार्हता निर्माण केली आहे, त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास आणखी वृद्धिंगत करणे ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रशिक्षणाद्वारे संपूर्ण सरकारी दृष्टिकोन देखील विकसित केला पाहिजे आणि अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. प्रशिक्षण संस्थांमध्ये नियुक्तीला ‘शिक्षा नियुक्ती’ म्हणून पाहण्याचा जो जुना दृष्टीकोन होता, तो बदलत आहे यावरही पंतप्रधानांनी भर दिला. अनेक दशके सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्यामुळे या प्रशिक्षण संस्था महत्वपूर्ण ठिकाणे असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

प्रशिक्षण देऊन प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यामध्ये लोकसहभागाचे महत्त्व बिंबवले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. उपस्थितांना हे समजावून सांगताना त्यांनी स्वच्छ भारत मोहीम, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम, अमृत सरोवर आणि जगातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा भरीव वाटा याचे श्रेय लोकसहभागालाच दिले. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रशिक्षण हे प्रत्येक स्तरासाठी आहे आणि प्रत्येकासाठी आहे. या अर्थाने, iGOT कर्मयोगी या अॅपमुळे उपलब्ध झालेल्या व्यासपीठाने सर्वांना प्रशिक्षणाची संधी देऊन समानतेचे क्षेत्र निर्माण केले आहे. ते म्हणाले की, iGOT कर्मयोगी नोंदणी या अॅपची 10 लाख वापरकर्त्यांची संख्या ओलांडणे हे दर्शवते की व्यवस्थेमधील लोक शिकण्यास उत्सुक आहेत. ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी मोहीम सरकारी कर्मचार्‍यांची अभिमुखता, मानसिकता आणि दृष्टीकोन सुधारण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून त्यांना समाधानी आणि आनंदी वाटेल आणि या सुधारणेचे उप-उत्पादन म्हणून, प्रशासकीय यंत्रणा नैसर्गिक पद्धतीने सुधारते.

त्यांनी संमेलनामध्ये सहभागीं असलेल्या सर्वांना दिवसभराच्या चर्चेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी सर्वोत्कृष्ट आणि त्यांना कृती करण्यायोग्य मते देण्याची सूचना केली, ज्यामुळे देशातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल. ठराविक अंतराने अशा परिषदांचे आयोजन करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी बोलतांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT