Pm Narendra Modi and Vladimir Putin Saam Tv
देश विदेश

India Russia News: PM मोदींचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली.

Satish Kengar

PM Modi holds phone call with Russian President Putin:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी आपण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांनी आगामी ब्रिक्स शिखर परिषदेपासून युक्रेन युद्धापर्यंतच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशाला भेट दिलेली नाही. मात्र दोन्ही नेत्यांची अनेकवेळा विविध मुद्द्यांवर फोनवर चर्चा होत राहिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले, “राष्ट्रपती पुतीन यांच्याशी चर्चा झाली. आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक भागीदारीतील विविध सकारात्मक घडामोडींवर चर्चा केली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी रोडमॅप तयार करण्यास सहमती दर्शवली. रशियाच्या ब्रिक्स अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही आमच्यात विचारांची देवाणघेवाण झाली.''   (Latest Marathi News)

"दोन्ही नेत्यांनी रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला," असे पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी दोन्ही देशांतील घडामोडींचे मूल्यमापन केले आणि भारत-रशिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी भविष्यातील रोडमॅप विकसित करण्यास सहमती दर्शविली.

पीएमओने म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2024 मध्ये ब्रिक्स अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. दोन्ही नेत्यांनी भविष्यातही संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT