PM Modi Meets Joe Biden Saam TV
देश विदेश

PM Modi Meets Joe Biden : जो बायडेन यांच्या पत्नीला मोदींकडून ग्रीन डायमंड गिफ्ट, पाहा गिफ्टची संपूर्ण लिस्ट

PM Modi in America : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड गिफ्ट केला.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi in America : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदंनी आज व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान मोदींना बायडेन दाम्पत्याला काही गिफ्टही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड गिफ्ट केला. तर जो बायडेन यांना खास चंदनाची पेटी भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी बायडेन दाम्पत्याला दिलेल्या गिफ्ट्समध्ये भारतीय संस्कृतीची झलक आहे. चंदनाची पेटी जयपूर येथील एका कुशल कारागिराने हाताने बनवली होती. ही पेटी म्हैसूर चंदनापासून बनवली आहे.

या बॉक्समध्ये गणपतीची मूर्ती देखील आहे. ही मूर्ती कोलकात्यातील चांदीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबातील पाचव्या पीढीतील कारागिरांनी हाताने बनवली आहे. डब्यात एक दिवा देखील आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो बायडन यांना दिलेल्या गिफ्ट्समध्ये गौदान, महाराष्ट्रातील गूळ, पंजाबमधील तूप, राजस्थानमध्ये हाताने बनवलेला 24 कॅरेट हॉलमार्कचा सोन्याचा शिक्का, श्री गणेशाची मूर्ती, गुजरातचे मीठ यांचा समावेश आहे.

तर पश्चिम बंगालमधील कारागिरांनी बनवलेला चांदीचा नारळ, कर्नाटकमधल्या म्हैसूरच चंदन, तामिळनाडूमधील तीळ, उत्तराखंड मधील तांदूळ मोदींना बायडेन यांडा गिफ्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT