PM Modi on Odisha Train Accident Saam TV
देश विदेश

PM Modi on Odisha Train Accident : 'ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो', PM मोदींनी व्यक्त केले दुःख

PM Modi : ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Odisha Train Accident: ओदिशामध्ये रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.

ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले कील, 'ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे.'  (Railway Accident)

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. (latest Marathi News)

आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू

कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. मिळालेल्या माहितीनुसार सात डबे उलटले, चार डबे रेल्वे हद्दीबाहेर गेले. एकूण 15 डब्बेर रुळावरून घसरले आहेत. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT