Russia-ukraine War: युक्रेन संकटाविषयी PM मोदींची नेदरलँडच्या पंतप्रधानांशी चर्चा @ANI
देश विदेश

Russia-ukraine War: युक्रेन संकटाविषयी PM मोदींची नेदरलँडच्या पंतप्रधानांशी चर्चा

रशिया- युक्रेन युद्ध सध्या सुरू आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन युद्ध (Russia-ukraine War) सध्या सुरू आहे. युक्रेनच्या संकटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे (Netherland PM Mark rutte) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. (PM Modi discusses Ukraine crisis with PM)

हे देखील पहा-

यादरम्यान पंतप्रधान (PM) मोदींनी भारताकडून (india) शत्रुत्व संपवण्याच्या, संवाद आणि शांततेच्या मार्गावर परतण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine) सुरू असलेल्या चर्चेचे देखील स्वागत केले आहे. दरम्यान, पीएम मोदी यांनी रुटे यांना संघर्ष क्षेत्रामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याविषयी तसेच बाधित लोकसंख्येकरिता औषधांसह तत्काळ मदत पुरवठ्याच्या स्वरूपामध्ये मदतीची माहिती दिली आहे.

संवादाच्या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी एप्रिल २०२१ मध्ये रुट्टे यांच्याबरोबर झालेल्या परिषदेची आठवण करून दिली आहे, आणि त्यांचे भारतात लवकरच स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अगोदर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (President) झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बरोबर स्वतंत्र दीर्घ चर्चा केली होती.

युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू झाल्यावर पुतिन यांच्याशी मोदींची ही तिसरी चर्चा होती. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा मुद्दा दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये प्रमुख मुद्दा असणार होता. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १४वा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमधील अनेक शहरांना मोठा फटका बसला आहे. याबरोबर युक्रेनमध्ये अनेक सामान्य लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सुमारे २० लाख लोकांनी देश सोडून पळाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT