Indian Plane Crash Saam TV
देश विदेश

Plane Crash: अफगाणिस्तानात कोसळलेलं विमान भारताचं नाही; DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Plane Crash in Afghanistan: अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतात कोसळलेलं विमान हे भारतीय विमान असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र , DGCA च्या अधिकाऱ्यांनी हे विमान भारताचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Vishal Gangurde

Plane Crash in Afghanistan:

अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतात रविवारी एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली. बदख्शां प्रांतात कोसळलेलं विमान हे भारतीय विमान असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र , DGCA च्या अधिकाऱ्यांनी हे विमान भारताचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच विमान अपघातातील जीवितहानीविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

रशियाने काय सांगितलं?

रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'अफगाणिस्तानात कोसळलेलं विमान हे शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होतं. या विमानात सहा प्रवासी होते. हे विमान फ्रान्समध्ये तयार करण्यात आलं होतं. या विमानाचं नाव फॅक्लन १० जेट होतं. हे चार्टर विमान भारताहून उज्बेकिस्तानच्या मार्गे मॉस्को येथे येत होते'.

दुसरीकडे केंद्र सरकारने स्पष्ट केलं की, अफगाणिस्तानातील दुर्घटना दुर्देवी आहे. कोसळलेलं विमान एअरक्राफ्टचं एक चार्टर विमान आहे. या विमानाची नोंदणी मोरक्का येथे झालेली आहे.

अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या प्रमुखाने सांगितलं की, हे विमान कुरान-मुंजान आणि जिबाक जिल्ह्याजवळील तोफखान्याजवळील डोंगराळ भागात कोसळलं. ही दुर्घटना घडल्यानंतर एक पथक तपास रवाना झालं आहे. स्थानिकांचा दावा आहे की, विमान रविवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT