Plane Crash Saam Tv
देश विदेश

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

Russia Plane Crash: रशियामध्ये लष्कराचे विमान कोसळले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच विमान कोसळले. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • रशियामध्ये लष्कराचे विमान कोसळले

  • अमूर प्रदेशात रशियन टीयू-९५ बॉम्बर विमान कोसळले

  • रशियात लष्करी विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू

  • प्रशिक्षण उड्डाणादरम्यान टीयू-९५ बॉम्बरचा अपघात

  • या अपघातामध्ये एक जण बचावला

रशियामध्ये विमान अपघाताची घटना घडली. रशियामध्ये रशियन Tu-95 बॉम्बर विमान कोसळले. या अपघातात विमानातील ६ जणांचा मृत्यू झाला. हे विमान एका प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे विमान कोसळलं. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली आणि आगीत होरपळून ६ जणांचा मृत्यू झाला.

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सुदूर पूर्वेकडील आमूर प्रदेशातील एका दुर्गम भागात हे बॉम्बर विमान कोसळले. या विमान दुर्घटनेमध्ये सहा जण ठार झाले असून विमानातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या विमान अपघाताचा तपास केला जात आहे.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, बॉम्बर विमानात शस्त्रे नव्हती पण हा अपघात नेमका कसा झाला याचा तपशील अद्याप उपलब्ध नाही. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी तपास पथक तयार करून घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या अपघातामागचे कारण शोधले जात आहे तसंच पुरावे गोळा केले जात आहेत.

प्राथमिक अहवालानुसार, Tu-95 बॉम्बर विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यामधील इंधन टाकीचा स्फोट झाला ज्यामुळे आग लागली. क्षणात संपूर्ण विमान जळू खाक झाले. विमानात असलेल्या सातपैकी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. विमानातील उर्वरित एक कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवर निष्कासनाला एनसीपीचा विरोध

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT