Viral Maternity Photoshoot Saamtv
देश विदेश

Viral Photoshoot: अहो आश्चर्यचं! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट, नेटकरीही चक्रावले; PHOTO तुफान VIRAL

Maternity Photoshoot: एकाचवेळी ३ पिढ्यांच्या या प्रेग्नेंसी फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे...

Gangappa Pujari

Trending Photoshoot: सध्या सर्वत्र फोटोशूटची प्रचंड क्रेझ सुरू आहे. वेडिंग फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट, प्रेग्नेंसी तसेच मॅटर्निटी फोटोशूट अशा अनेक प्रसंगी लोक फोटोशूट करत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच फोटोशूटचे वेड लागले आहे. मात्र सध्या एका अशा फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल..

हे प्रेग्रेसी फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरण्याचा कारण म्हणजे घरातल्या लेकीसह तिची आई, सासू आणि आजीही प्रेग्नंट झाली आहे. प्रेग्नन्सीच्या या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमकी काय आहे ही भानगडं, चला जाणून घेवू.. (Latest Marathi News)

घरात चिमुकला पाहुणा येणार म्हणलं की सगळी फॅमिलीच खुश असते. प्रत्येकजण या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक असतो. कुणी आई-बाबा होणार म्हणून, कुणी आजी-आजोबा होणार म्हणून, कुणी काका-काकी होणार म्हणून तर कुणी मामा-मामी होणार म्हणून या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत असतो. सध्या या व्हायरल होत असलेल्या या कुटूंबानेही असेच हटके फोटोशूट (Unique Photoshoot) करायचं ठरवलं.

त्यामुळे त्यांच्या फोटोशूटमध्ये  सून सासू एवढंच नाही तर आई आणि आजीही गर्भवती आहे. 3 पिढ्यातील महिला एकाच वेळी गर्भवती झाल्याचे दिसत आहेत. सासू सून आई आणि आजीने एकत्र बेबी बंप फ्लॉन्ट (Baby Bump) करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नेमका काय आहे प्रकार..

वास्तविक झालं अस की, प्रेग्नेंसीचे (Viral Pregnancy Photoshoot) हे फोटो काढले आहेत ते जिबिन जॉयने. जो एक फोटोग्राफर आहे. जिबिनने हे मॅटरनिटी फोटोशूट केलं आहे. त्याची बायको चिंचू पीएसचं हे मॅटरनिटी फोटोशूट आहे. ज्यात जिबिनचं कुटुंब दिसतं आहे. त्याच्या बायकोसह त्याची आई, सासू आणि वयाची 80 ओलांडलेली आजीही प्रेग्नंट दिसते आहे. सर्व दाम्पत्याने अगदी आईबाबा होणार असलेल्या दाम्पत्यांप्रमाणेच पोझ दिल्या आहेत.

जिबिनला (Photography Athreya) आपल्या पत्नीचं हटके मॅटरनिटी फोटोशूट करायचं होतं. त्याची बायको प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यात असताना त्याला एका फिल्ममुळे भन्नाट आयडिया सुटली. ही आयडिया त्याने कुटुंबाला सांगतिली. त्यांनाही ती आवडली आणि ते जिबिनसह यात सहभागी झाले. जिबिनने बायकोच्या मॅटरनिटी फोटोशूटमध्ये त्याचे आजी-आजोबा, आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांनाही दाखवलं.

त्याने आऊटडोर फोटोशूट केलं. सर्व पिढीच्या महिलांना त्याने प्रेग्नंट दाखवलं. सध्या या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या फोटोशूटचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT