पेट्रोल पंपांवर गर्दी होत आहे. संग्रहित छायाचित्र.  Saam TV
देश विदेश

Petrol - Diesel : पेट्रोल-डीझेल आणि एलपीजी सिलिंडर; गॅस तुटवडा, पंपावरील गर्दीमागचं कारण काय? सरकारनं दिली महत्वाची माहिती

petrol diesel supply normal panic buying at fuel pumps india : सध्या देशभरातील पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होतेय. काही ठिकाणी पंप बंद आहेत. मात्र, पेट्रोल-डीझेल साठा असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. ही गर्दी का होतेय? काय आहे सद्यस्थिती? सरकारनं नेमकी काय माहिती दिली, वाचा

Nandkumar Joshi

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील पंपांवर प्रचंड गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. देशात पेट्रोल, डीझेल, एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा आहे. सरकारने विविध पातळ्यांवर अनेक उपाय केले आहेत आणि ते सुरूच आहेत, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं.

देशात पेट्रोल-डीझेल, एलपीजीचा साठा मुबलक

देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा आहे. ही उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं विविध स्तरांवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. रिफायनरीज नियमितपणे कार्यरत आहेत. कच्च्या तेलाचा साठाही पुरेसा आहे. बहुतांश पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहेत. तरी काही ठिकाणी अफवांमुळे खरेदी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, असेही शर्मा म्हणाल्या.

पेट्रोल, डीझेल मुबलक प्रमाणात असल्याचंही शर्मा यांनी नागरिकांना सांगितलं. देशांतर्गत बाजारात पुरवठा कायम राहावा आणि किंमती वाढू नयेत यासाठी सरकारनं पेट्रोल-डीझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केल्याचं शर्मा यांनी सांगितलं. देशांतर्गत बाजारात डिझेलची उपलब्धता कायम राखण्यासाठी निर्यातीवरही अधिभार लावला आहे, अशीही माहितीही सुजाता शर्मा यांनी दिली.

पाइप गॅससाठी जोरदार प्रयत्न

नैसर्गिक वायूच्या बाबतीत, घरगुती ग्राहक आणि सीएनजी वाहतुकीसाठी १०० टक्के पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. ग्रीडशी जोडलेल्या उद्योगांसाठी सुमारे ८० टक्के पुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांत सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी राज्य सरकारांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रयत्नांना गती देण्यासाठी केंद्रातील विविध मंत्रालयांनाही सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात अनेक मंत्रालयांनी पीएनजी नेटवर्कचा विस्तार सुलभ करण्यासाठी आदेश दिल्याचे सुजाता शर्मा यांनी सांगितले.

वितरकांकडे एलपीजीचा साठा संपलेला नाही

कोणत्याही वितरकाकडे एलपीजी साठा संपल्याची परिस्थिती नाही; पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याची उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे. काल झालेल्या एकूण बुकिंगपैकी सुमारे ९५ टक्के बुकिंग ऑनलाइन करण्यात आले आहे. तर सुमारे ८२ टक्के वितरण डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे (ओटीपी) पडताळण्यात आले आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांत सुमारे १.०४ कोटी बुकिंग करण्यात आले असून त्यापैकी जवळपास ९२ लाख सिलिंडर वितरित करण्यात आले आहेत. व्यावसायिक एलपीजीबाबत, सरकारने त्याची उपलब्धता सुमारे ७० टक्क्यांनी वाढवली आहे. ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कँटीन आणि स्थलांतरित कामगारांना प्राधान्याने पुरवठा केला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT