Petrol-diesel Saam Tv News
देश विदेश

Petrol Diesel: कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले; पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारात सुद्धा दिसून येत आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 108 दिवस उलटून गेले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मात्र, 24 तासांत ब्रेंट क्रूडची किंमत 2.80 डॉलरने घसरून प्रति बॅरल 92.32 डॉलर वर आली आहे. त्याचप्रमाणे, WTI ची किंमत देखील प्रति बॅरल 2.5 डॉलरने घसरली आणि त्याची किंमत प्रति बॅरल 86.28 डॉलरवर पोहोचली आहे.

हे देखील पाहा -

4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT