petrol diesel
petrol diesel Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीतून मोठा दिलासा! आजचे नवीन दर तपासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या (Petrol) दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्यावर सरकारचने उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. तेव्हापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता कायम आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असून, गेल्या काही दिवसांत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचले आहे. WTI क्रूड 100 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे, तर ब्रेंट क्रूडची किंमत 100 डॉलरच्या वर आहे. मंगळवारी WTI क्रूड प्रति बॅरल 95.60 डॉलरवर पोहोचले आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड देखील प्रति बॅरल 104.8 डॉलरवर दिसले. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे सरकारने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करून दिलासा दिला आहे.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT