Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Latest Rate : जागतिक बाजारात क्रूडच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 85 डॉलरच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल (Petrol) 11 पैशांनी महागून 96.76 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल 11 पैशांनी वाढून 89.93 रुपये प्रति लीटर झाले आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.44 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. येथे डिझेल (Diesel) 13 पैशांनी घसरून 89.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्येही पेट्रोल ४१ पैशांनी स्वस्त झाले असून ते ९६.७७ रुपये प्रति लिटर झाले आहे. येथे डिझेल 40 पैशांनी घसरले असून 89.65 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT