GYANESH KUMAR SIR PETITION saam tv
देश विदेश

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

Petition Against Gyanesh Kumar In Bombay High Court: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील काही निर्णयांना आव्हान देणारी याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली असून, SIR प्रक्रियेत अनियमतता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रथमेश गावकर यांनी अड असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. निवडणुका आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि पुन्हा समावेश करणे, मतदार यादीचा डेटाबेस, Electoral Registration Officers म्हणजेच निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे कामकाज तसेच सॉफ्टवेअरशी संबंधित प्रक्रियांबाबत हे आक्षेप असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

SIR प्रक्रियेतील निर्णयांवर कायदेशीर प्रश्न

निवडणूक आयोगाने Chief Election Commissioner and Other Election Commissioners Act, 2023 मधील कलम 18 नुसार सामूहिक पद्धतीने निर्णय घेतले का, असा कायदेशीर प्रश्नही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. जुलै 2026 मध्ये करण्यात आलेल्या Form-6 मधील बदलांनाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. तसेच 14 एकतर्फी प्रशासकीय आदेश आणि बदल रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. तसेच नव्याने आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार मतदार याद्या तयार करून त्यांना मंजुरी मिळेपर्यंत संबंधित राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Dategad Fort: दातेगडच्या कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर; या अनोख्या रचनेमागचं रहस्य नेमकं काय?

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT