Karnataka 19 Year Old Girl Death  Saam Tv
देश विदेश

Shocking : मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Karnataka 19 Year Old Girl Death News : कर्नाटकातील तुमकुर येथे मासिक पाळीच्या तीव्र वेदनांमुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष किती घातक ठरू शकते याचे हे उदाहरण आहे.

Alisha Khedekar

  • मासिक पाळीच्या तीव्र वेदनांमुळे तरुणीचा मृत्यू

  • वेळेवर उपचार न मिळाल्याने जीवघेणा परिणाम

  • मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे

मुलींना येणारी मासिक पाळी ही वेदनादायक असते. या वेदनेकडे ती किरकोळ म्हणून अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र या वेदनेने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सदर घटना ही कर्नाटकातील तुमकुर येथे घडली आहे. तरुणीला मासिक पाळीत पोटात तीव्र वेदना झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारिया (बदलेलं नाव ) नोकरीच्या शोधात दोन महिने तिच्या मामाच्या घरी आली होती. नोकरी न मिळाल्याने ती तिथेच राहिली. तिला काय होत आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. मारिया बऱ्याच काळापासून पोटदुखी आणि मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त होती. तिला वेदना इतक्या तीव्र व्हायच्या की ती दैनंदिन कामे करू शकत नव्हती.

समाजात महिलांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू असलेल्या मासिक पाळीवर जास्त चर्चा केली जात नाही. अनेकदा मुली या त्रासाबद्दल इतरांना सांगताना घाबरतात. परिणामी, मारिया तिच्या वेदना कोणालाही सांगू शकली नाही. तिला उघडपणे व्यक्तही करता येत नसलेल्या वेदनांमुळे ती खूप दुःखी होती. दरम्यान या मासिक पाळीच्या वेदनांमुळे तिचा मृत्यू झाला.

ज्या दिवशी मारियाचा मृत्यू झाला त्या दिवशी घरी कोणीही नव्हते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेने मारियाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . वेळोवेळी छोट्या छोट्या आजारांवर उपाय करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; 2500 कोटींची रडार यंत्रणा उद्ध्वस्त, जगात तिसरे महायुद्ध? VIDEO

Maharashtra Live News Update: धुळ्यातील 25 जण दुबईमध्ये अडकले

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; तब्बल १०१ जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

मुख्यमंत्र्यांची वर्णी राज्यसभेवर? राज्याचे उपमुख्यमंत्री बदलणार; देशाच्या राजकारणाला हादरा

Thursday Horoscope: खर्च वाढेल, अपूर्ण कामं पू्र्ण होतील; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT