Crime Saam tv
देश विदेश

Crime News: हॉटेलमध्ये सासूकडून सुनेला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न; परपुरूषासोबत शारीरिक संबधाची बळजबरी अन्..

Patna Strumpet Case: एका विवाहित महिलेने आपल्या सासरच्यांविरोधात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Bhagyashree Kamble

पाटणामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या सासरच्यांविरोधात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, मंगळवारी तिच्या सासूने तिला पाटणा जंक्शनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे नेत तिला एका अनोळखी व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. ती कशीशी तेथून सुटली आणि थेट आरपीएफ चौकीवर पोहोचली. तिथे जाऊन पीडितेने घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

आरपीएफने पीडितेला रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. तिथून तिला महिला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. तिथे पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, अधिकृतरित्या गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे लग्न ४ वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू होता. तसेच तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितेने केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT