Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam Tv
देश विदेश

Patna Opposition Meeting : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे गरजले; म्हणाले, लोकशाहीवर आघात केला तर...

Priya More

Patna Opposition Unity Meeting : पाटणामध्ये आज विरोधकांची महत्वपूर्ण बैठक (Patana Opposition Parties Meeting) पार पडली. मोदी सरकारविरोधात (Modi Government) आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातील (Loksabha Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची ही बैठक होती.

या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.'देशाला वाचवण्यासाठी, देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका करताना सांगितले की, 'केंद्र सरकारकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांवर अन्याय होत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष आपापसातील मतभेद सोडून पुढे जाणार आहोत. देशातील जनता आमला समर्थन देईल.' तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'मोदी सरकारकडून देशाच्या लोकशाहीवर आघात केला जात आहे. देशावर हुकुमशाही लादली जात आहे.', असा आरोप त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'वेगवेगळ्या पक्षाची आम्ही लोकं आहोत त्यामुळे आमची विचारधारा वेगळी आहे. आमच्या विचारांमध्ये भिन्नता असून शकते. पण देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यापुढे आपल्या देशाच्या लोकशाहीवर कोणी आघात केला तर आम्ही एकजुटीने त्याला विरोध करु.'

तसंच, 'जो देशद्रोही आहे आणि देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही उभे राहू. सुरुवात चांगली झाली आहे की पुढे सर्वकाही चांगले होते. इथून पुढे अधून मधून आपण भेटत राहू.' असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, आजच्या विरोधकांच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, दीपंकर भट्टाचार्य यांनी हजेरी लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा, त्या अधिकाऱ्याला इथूनच आऊट करतो; मनोज जरांगे कुणावर भडकले?

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT