Punjab News saam digital
देश विदेश

Punjab News: धक्कादायक! ऑनलाइन मागवलेला केक खाल्ल्याने मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू

Shocking News: पंजाब राज्यातील पटियालामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पटियालामध्ये केक खाल्ल्यामुळे एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, असा दावा मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Patiala Birthday Girl Death News

पंजाब राज्यातील पटियालामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पटियालामध्ये केक खाल्ल्यामुळे एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, असा दावा मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. पटियालामधील ही घटना आहे. या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन(Online) केक मागवला होता. तो खाल्ल्यानंतर काही तासांत तिचा मृत्यू झालाय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मुलीच्या मृत्यूनंतर तिचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मृत मुलगी तिच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी वाढदिवस(Birthday) साजरा करताना खूप आनंदी दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी पंजाब राज्यातील पटीयालामध्ये तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. तिच्या कुटुंबियांनी या १० वर्षीय मुलीच्या वाढदिवासानिमित्त ऑनलाईन केक मागवला होता. मात्र, केक खाल्ल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झालाय. मानवी, असं या मृत तरुणीचं नाव आहे.

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी सांगितले की, केक कुठून आला होता या सर्व गोष्टींचा तपास केला जात आहे. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन पाठवला आहे.सध्या मुलीच्या आजोबांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजोबांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घडलेली सर्व घटना सांगितली आहे.

यावेळी बोलताना मुलीच्या आजोबांनी सांगितलं की, त्या दिवशी संध्याकाळी केक ऑर्डर केला होता. केक खाल्ल्यानंतर घरातील सदस्यांची तब्येत खराब होण्यास सुरुवात झाली. त्यात १० वर्षीय मुलगी आणि तिची लहान बहिणसुद्धा होती. मात्र, तिच्या लहान बहिणीला उलटी झाल्यामुळे तिच्या पोटातून खाल्लेला केक बाहेर पडला. या घटनेत ती वाचली, मात्र मानवीचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या साठ्यात ४० टक्क्यांची घट

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT