Patana Opposition Parties Meeting Saam Tv News
देश विदेश

Patana Opposition Parties Meeting: विरोधकांचं मिशन 2024! पाटणामध्ये मोदी सरकारविरोधात महत्वाची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरेंसह हे नेते राहणार उपस्थित

Patana Opposition Unity Meeting: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या पुढाकाराने पाटणामध्ये विरोधी पक्षांच्या एकतेची ही बैठक होणार आहे.

Priya More

Patana News: पाटणामध्ये आज विरोधकांची महत्वपूर्ण बैठक (Patana Opposition Parties Meeting) होणार आहे. मोदी सरकारविरोधात (Modi Government) आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातील (Loksabha Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची ही बैठक असणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या पुढाकाराने पाटणामध्ये विरोधी पक्षांच्या एकतेची ही बैठक होणार आहे.

पाटणा येथे आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची ही बैठक होणार आहे. विरोधकांच्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीला 19 विरोधी पक्षांचे नेते हजेरी लावणार आहेत. या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते पाटण्यामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे देखील पाटणामध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे गुरुवारीच पाटणामध्ये दाखल झाले होते.

या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, भाकपा महासचिव डी राजा हे पाटणामध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील नुकताच पाटणा एअरपोर्टवर दाखल झाले असून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीसाठी गुरुवारी संध्याकाळीच एमके स्टालिन हे पाटणामध्ये दाखल झाले होते.

महाराष्ट्रातून देखील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. तर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. हे सर्व नेतेमंडळी पाटणाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची पाटणामध्ये पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ते मुंबईला रवाना होतील.

या बैठकीमध्ये लोकसभेच्या 450 जागांवर भाजपच्या विरोधात सामान्य उमेदवार उभा करायचा का?, पंतप्रधान मोदींच्या विरोधात कोणाचा चेहरा पुढे करायचा की सामूहिक नेतृत्वाखाली लढायचा? या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यूपीए संयोजक आणि यूपीए निवडणूक प्रचार प्रमुख पदाबाबत चर्चा होणार आहे. त्याचसोबत, तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा आणि मणिपूर हिंसाचार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT