Supriya Sule, Amol Kolhe MP Suspended in Parliament Delhi SAAM TV
देश विदेश

Parliament MP Suspended: निलंबन 'सत्र' सुरूच! सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित

Supriya Sule, Amol Kolhe MP Suspended in Parliament Delhi: पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली| ता. १९ डिसेंबर २०२३

Parliament MP Suspended: 

लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र आहे. काल लोकसभेत ३३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर आज (मंगळवार, १९ डिसेंबर) पुन्हा एकदा विरोधकांच्या ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांचा यामध्ये समावेश आहे.

कारवाई सत्र सुरूच..

संसदेची सुरक्षा भेदल्याची (Parliament Security Breach) घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.  घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. संसद सुरक्षेच्या प्रश्नावरुन आजही (१९, डिसेंबर) लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ज्यानंतर पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

पुन्हा ४९ खासदार निलंबित..

काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतर आता पुन्हा तब्बल ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हे (Amol Kolhe), कॉंग्रेसचे शशी थरुर (Shashi Tharur), मनिष तिवारी, डिंपल यादव, यांच्या नावाचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलंबनाची रेकॉर्डब्रेक कारवाई..

दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी १९ आणि त्यानंतर ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT