Parliament Security Breach Saam TV
देश विदेश

Parliament Attack: संसद घुसखोरीतील आरोपींना कोणती शिक्षा होणार; काय आहे UAPA कायदा? वाचा सविस्तर..

Gangappa Pujari

Parliament Security Breach:

नव्या संसदेत काल, बुधवारी देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे २ तरूण थेट लोकसभेत घुसले होते. तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सदस्यांच्या बाकावर उड्या मारल्या. तसेच स्मोक कँडल देखील फोडल्या होत्या. या घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UAPA कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोषी आढळल्यास आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार? जाणून घ्या सविस्तर....

संसदेतील घुसखोरी प्रकरणात (Parliament Attack) मनोरंजन गौडा, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन गौडा हे व्हिजिटर पासमधून सभागृहात पोहोचले. आणि त्यांनी रंगीत धुराच्या काठ्यांद्वारे गॅस फवारला, तर दोन आरोपी संसद भवन संकुलात धुराच्या काठ्यांद्वारे गॅस फवारत होते. पाचवा आरोपी ललित झा हा व्हिडिओ बनवत होता. तो सध्या फरार आहे.

काय आहे UAPA कायदा...

संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या या तरुणांवर UAPA (Unlawful Activity Prevention Act.) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे १९७० बनवण्यात आलेला UAPA कायदा हा अतिशय कडक कायदा आहे. बेकायदेशीर संस्थांवरील कारवाईसाठी याची निर्मिती करण्यात आली होती. या अंतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय होणार शिक्षा?

बेकायदेशीर क्रिया म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्याच्या उद्देशाने एखादी व्यक्ती किंवा संस्थेने केलेली कोणतीही कृती. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. UAPA अंतर्गत, तपास यंत्रणा अटक केल्यानंतर जास्तीत जास्त 180 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करू शकते आणि न्यायालयाला माहिती दिल्यानंतर मुदत वाढवता येते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT