प्रमोद जगताप, प्रतिनिधी...
Rahul Gandhi News: मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधकांच्या INDIA आघडीने संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. काल चर्चेचा पहिला दिवस होता. आज दुसऱ्या दिवशी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी संसदेत बोलत आहेत.
यावेळी राहुल गांधी यांनी सर्वप्रथम लोकसभा अध्यक्षांची माफी मागितली. तसेच आज मणिपूर हिंसाचारावरुन बोलणार आहे, अदांनीवरुन बोलणार नसल्याने घाबरु नका.. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अदांनींच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "गेल्या वेळी जेव्हा मी अदानीजींवर बोललो तेव्हा लोकांना त्रास सहन करावा लागला होता. 'मी आज अदानींवर बोलणार नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी घाबरण्याची गरज नाही. आज मी मनापासून बोलणार आहे..." असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना हा देश समजून घेण्यासाठी मी भारत जोडो यात्रा काढल्याचे सांगितले. "या यात्रेदरम्यान मला त्रास झाला. कंटाळा आला पण भेटणारी प्रत्येक व्यक्ती मला ताकद देत होती. या यात्रेच्या तिसऱ्याच दिवशी माझा अहंकार नष्ट झाला असे म्हणत.. या यात्रेमध्ये शेतकऱ्यांनी, महिलांनी, त्यांची दुःख सांगितल्याचे" ते म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.