Louvre Museum in Paris under investigation after priceless Napoleon and Josephine jewels were stolen in a daring daylight robbery saam tv
देश विदेश

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Paris Louvre Museum Robbery: पॅरिसमधील संग्रहालयात दरोडा पडला असून कला संग्रहालयांतील दागिने चोरीला गेले आहेत. दरम्यान संग्रहालयातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Bharat Jadhav

  • पॅरिसमधील लूव्र संग्रहालयात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची घटना घडलीय.

  • नेपोलियन आणि जोसेफिन यांचे दागिने चोरीला गेले आहेत.

  • घटनेनंतर संग्रहालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगातील सर्वात महत्त्वाच्या लूव्र संग्रहालयात दोरडा पडलाय. विशेष म्हणजे संग्रहालयात दिवसढवळ्या दरोडा पडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. या दरोड्यात नेपोलियन आणि जोसेफिन यांचे दागिनेही चोरीला गेले आहेत. या चोरीच्या घटनेने संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसलाय. दरम्यान चोरी झाल्याची माहिती होताच संग्रहालय ताबडतोब रिकामे करण्यात आले. तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

चोरांनी नेपोलियन आणि जोसेफिन यांचे मौल्यवान दागिने लंपास केले आहेत. दरोड्यानंतर, संग्रहालय बंद करण्यात आले आणि पोलीस तपास करत आहेत. फ्रान्सच्या माध्यमांच्या वृत्तानुसार चोरट्यांनी संग्रहालयात घुसण्यासाठी योग्य प्लॅन केला होता. चोर संग्रहालयाशेजारी असलेल्या सीन नदीजवळील सेवा क्षेत्रातून संग्रहालयात घुसले. नंतर A6 महामार्गाकडे स्कूटरवरून पळून गेले. हा दरोडा टाकण्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिग केली होती. त्यामुळे कोणाला त्यांचा संशय आला नाही ना कोणाला त्याच भनक सुद्धा लागली नाही.

दरोड्यात चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये नेपोलियन बोनापार्ट आणि त्यांची पत्नी जोसेफिनशी थेट संबंधित नऊ ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. यात तियारा, ब्रोच आणि इतर किमती दागिन्यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत खूप असल्यानं लूव्र संग्रहालयात चोरी होणं हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. चोरीच्या घटनेमुळे तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

संग्रहालयात दरोडा पडल्याच्या वृत्ताला तेथील फ्रेंच संस्कृती मंत्र्यांनी दुजोरा दिलाय. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. संग्रहालय सध्या बंद असून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.

लुव्र संग्रहालयातील मोनालिसासारख्या इतर प्रसिद्ध कलाकृतींना या दरोड्यात नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. ही घटना केवळ पॅरिसमधील लोकांसाठी नाही तर जगभरातील कलाप्रेमींसाठी एक मोठा धक्का आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT